नगरसेवक अमोल बालवडकर यांचा उपक्रम…
पुणे(प्रतिनिधी) – पुणे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून ‘ऑनलाईन योग साधना शिबीराचे” आयोजन नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यावतीने करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 1 हजारहून अधिक पुणेकरांनी ऑनलाईन सहभाग घेत, योग प्रशिक्षणाचे धडे गिरविले. त्यासाठी नागरीकांना फेसबुक लाईव्ह, झुम अॅप व इतर सोशल मिडियाच्या माध्यमातुन या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या शिबिरात डॉ. मनाली आमोद देव (आंतरराष्ट्रीय योगा पदक विजेत्या, भारतीय योगा संघ प्रशिक्षक), प्रिती अभ्यंकर (आंतरराष्ट्रीय योगा चॅम्पियन), आयुष देव (योगशिरोमणी पुरस्कार विजेता) यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच योगाचे महत्त्व विषद केले. यात उपक्रमात प्रभागातील नागरिकांसह शहरभरातील नागरिकही सहभागी झाले होते.
बालवडकर यांच्या वतीने दरवर्षी बालेवाडी येथील क्रीडा संकूलात हे शिबिर घेतले जाते. त्यात, बाणेर, बालेवाडी भागातील नागरीक मोठया प्रमाणात सहभागी होतात. मात्र, यावर्षी करोनाच्या साथीमुळे ऑनलाईन शिबिर घेण्यात आले असले तरी त्याला मिळालेला प्रतिसाद मागील वर्षाप्रमाणेच मिळाला असून नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.