अकोले आदिवासी व डोंगराळ भागातील रुग्ण, जिथे दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा आहेत, अशा भागातील नागरिकांना तालुक्याचे ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात उपचार, निदान व मोफत शस्त्रक्रिया आदी आरोग्याची सुविधा देण्यासाठी शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत चार दिवसांचे आरोग्य शिबीर अकोलेत होत आहे. या शिबिरात वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ डॅाक्टर उपस्थित राहणार असल्याने अकोले तालुक्यातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संजय घोगरे यांनी केले.
अकोले ग्रामीण रुग्णालयात सर्वरोग निदान, दंतरोग व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संजय घोगरे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पोलिस निरीक्षक विजय करे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य प्रा.सुरेश खांडगे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. बाळासाहेब मेहेञे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. .श्यामकांत शेटे.
राजुरचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. दिघे, कोतुळचे डाॅ. राहुल कवडे, डाॅ. सुरेखा करवंदे, डाॅ.शंतनू राहणे, डाॅ. गडाख उपस्थित होते. या शिबिरात चार दिवसांत शस्त्रक्रिया होतीलच परंतु ज्या शस्त्रक्रिया येथे करणे शक्य नाही त्या शस्त्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रवरा मेडिकल कॅालेज येथे पुढील १० ते १५ दिवसांत केल्या जातील .या शिबिरात तालुक्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी येउन लाभ घ्यावा,असे आवाहन केले. यावेळी प्रा.सुरेश खांडगे, पोलीस निरीक्षक विजय करे यांनी मनोगत व्यक्त केले.