खालापूर, (वार्ताहर) – सावरोली गावच्या हद्दीतील टाटा स्टील कंपनीसमोरील भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना गुरूवार (दि. ७) दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
भंगाराच्या दुकानात प्लास्टिक, रबर आणि ऑइलच्या डब्यांमुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. तसेच तसेच आग लागलेल्या ठिकाणी टाटा पाँवरचा लाइन गेली असल्याने आग विझवताना मोठी आडचण येत होती.
सावरोली गावच्या हद्दीतील टाटा स्टील कंपनी समोरील भंगाराच्या दुकानामागील जागेत मोठ्या प्रमाणात गवताचे शेत आहे. सदर आग गवताला लागल्यामुळेच ती सर्वत्र पसरली.
भंगारच्या दुकानात ज्वलनशील वस्तूंमुळे आगीने रौद्ररूप घेतले. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल आले. खोपोली नगरपालिका, टाटा, गोदरेज, उत्तम कंपनी,
जेएसडब्ल्यू आणि एमआयडीसी आदी ठिकाणच्या अग्निशमनला दलाने आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. आगीत भंगाराच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी पोलीस, खालापूर तहसिलचे अधिकारी, अपघातग्रस्त टिमचे सदस्य उपस्थित होते.