तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे येथील साक्षी डायग्नोस्टिक्स हेल्थ केअर सोल्युशन येथे कै. शलाका संतोष खांडगे यांच्या स्मरणार्थ पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या वेळी अध्यक्ष राहुल खळदे, सचिन कोळवणकर, सुनील खोल्लम, विन्सेंट सालेर, बाळासाहेब शिंदे, संदीप मगर, योगेश शिंदे आदी उपस्थित होते.तळेगाव दाभाडे, वडगाव, एमआयडीसी, शिरगाव या पोलीस ठाण्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदाब, इसीजी, एक्सरे, मधुमेह आदींची तपासणी करण्यात आली.
तसेच सिध्दार्थ किल्लावाला, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय तुंगार, वडगाव पोलीस ठाण्याचे कुमार कदम, तळेगाव दाभाडे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, शिरगाव पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, राज्य उत्पादन शुल्क शाखेचे संजय सराफ यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन दशरथ जांभुळकर यांनी केले.