नवी दिल्ली :- रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रूपयांची नोट बदलून घेण्यासाठी(जमा करण्यास) 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र त्यात आता वाढ करण्यात आली असून आता 7 ऑक्टोबरपर्यंत ही नोट बदलून घेता येईल किंवा जमा करता येईल.
नोटबदलीच्या निर्णयाचा आढावा घेतल्यानंतर आता हा नवीन निर्णय घेण्यात आला असल्याचे बॅंकेने म्हटले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे दोन हजाराची नोट आहे त्यांना आणखी एक आठवड्याचा कालावधी वाढीव मिळणार आहे.
आरबीआयनुसार, 29 सप्टेंबर 2023 पर्यंत 96 टक्के 2000 रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या 3.56 लाख कोटी मूल्याच्या नोटा चलनात होत्या. त्यानंतर आतापर्यंत 3.42 लाख कोटी रुपये मूल्य असणाऱ्या नोटा आरबीआयकडे परत आल्या आहेत.