अहवाल दोन दिवसात द्या अन्यथा आंदोलन

मनसेचा महापालिका प्रशासनाला इशारा

पिंपरी – महापालिका रुग्णालयांतून करोना रुग्णांचे “आरटीपीसीआर’ चाचणीचे अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेळ लागत असल्याने करोनाबाधित रुग्ण दगावत आहेत. हे अहवाल दोन दिवसांत मिळायला हवे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

रुग्णालयांच्या वतीने करोनाच्या आरटीपीसीआर (स्वॅब नमुना तपासणी) चाचणीचे अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शहरातील अनेक करोनाबाधित रुग्ण दगावत आहेत. अहवाल वेळेत मिळत नसल्याने उपचार करण्यासाठी वेळ लागत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत.

रुपीनगरमधील एका रुग्णाचा अहवाल उशिरा आला. तत्पूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला होता. करोना चाचणीचे अहवाल दोन दिवसांत मिळायला हवे, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याकडे केली. अंकुश तापकीर, मयुर हजारे, गणेश उज्जैनकर, जय सकट, काशिनाथ जाधव, प्रदीप गायकवाड आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.