इंदापुरात कोविड योद्‌ध्यांना प्रोत्साहन भत्ता

रेडा- सध्या करोनाने देशात थैमान घातले आहे. या महामारीमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्‍तींचा अंत्यसंस्कार करणाऱ्या इंदापूर नगर परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा आणि मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते प्रोत्साहन भत्ता वाटप करण्यात आला.

तुमचे जेवढे कौतुक करेल तेवढे कमी आहे. अशा प्रसंगांमध्ये घरचेदेखील पुढे येऊ शकत नाहीत. अशावेळी तुम्ही अंत्यसंस्काराचे कार्य पार पाडतात हे खूप मोठे कार्य आहे, असे नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या. आपणा सर्वांची काळजी वाटते.

आपण सर्व दक्षता घेऊन हे कार्य करावे. या कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेचा अभिमान वाटतो, असे मत मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी व्यक्‍त केले. मनोज बारटक्‍के यांनी नोगत व्यक्‍त केले.

यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, मोहन शिंदे, शार्दुल ताजणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्ताफ पठाण यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.