पुणे – गणेशोत्सवात डॉल्बी अथवा डीजे लावण्यासह ध्वनी प्रदूषण होत असल्याचे दिसल्यास थेट तक्रार करता येणार आहे. तसेच गणेश मंडळाच्या मांडवामुळे स्थानिक नागरिक, पादचारी तसेच रस्ते वाहतुकीस अडथळा होत असल्यास नागरिकांना तक्रार करण्यासाठी महापालिकेने हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला आहे.
ध्वनी प्रदूषण किंवा अन्य अडचणींबाबत नागरिकांना व्हॉट्स ऍपवरही तक्रार करता येणार आहे. त्यासाठीही मोबाइल क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. महापालिकेने दि. 8 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव मंडळांची बैठक बोलावली आहे. तसेच पर्यावरणपूरक व सुरक्षित गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहनही मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.
हेल्पलाइन क्रमांक
- टोल फ्री
1800-1030-222 - व्हॉटस् ऍप
9689-900-002 - अतिक्रमण नियंत्रण कार्यालय
020- 2550-1398
ही आहे महापालिकेची नियमावली
- सन 2019 मधील परवानाही मांडव, रनिंग मांडवासाठी ग्राह्य
- जागेत बदल झालेल्या मंडळाना नव्याने परवाना घ्यावा लागेल.
- परवाना प्रत दर्शनिय भागात लावणे बंधनकारक
- उत्सव मंडप जास्तीतजास्त 40 फूट उंच असावा
- 40 फुटांपेक्षा अधिक उंच मांडवासाठी स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक असणार.
- गणेश मूर्ती शाडू मातीच्या असाव्यात. उत्सव जास्तीत जास्त पर्यावरणपूक पद्धतीनेच साजरा केला जावा.
- उत्सव संपताच तीन दिवसात खड्डे दुरूस्त करावेत.
- मांडवाचे साहित्य, मिरवणूक रथ तातडीने रस्त्यावरून हटवावेत.
- जागेबाबत वाद झाल्यास परवाना रद्द करण्याचा अधिकार महापालिकेकडे असेल.
- पोलीस प्रशासन, महावितरण, महापालिकेच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक