पुणे – प्रसिद्ध उद्योगपती आणि भोसरी येथील लुब्रिकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक माधव काशिनाथ किर्लोस्कर यांचे अल्पशा आजाराने बुधवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.
त्यांच्यामागे पत्नी आशा किर्लोस्कर, उज्ज्वल आणि प्रशांत किर्लोस्कर हे दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. माधव किर्लोस्कर यांच्या पार्थिवावर औंध स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. उद्योग जगतातील अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
माधव किर्लोस्कर यांनी १९७० च्या दशकात लुब्रिकेअर प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करून व्यवसायास सुरवात केली. सध्या ते लुब्रिकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते.