इंग्लंडच्या खेळाडूंची मानधन कपात

लंडन – करोनामुळे जगभरात अनेक उद्योगांना फटका बसला तसाच क्रीडाक्षेत्रालाही बसला. त्यातच क्रिकेटचाही समावेश आहे. मात्र, बीसीसीआय वगळता अनेक देशांच्या क्रिकेट मंडळांनी आपल्या क्रिकेटपटूंच्या मानधनात मोठी कपात करण्याचेही निर्णय घेतले. त्यातच आता इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळानेही ही कपात लागू केली आहे.

मंडळाशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंना या पुढील काळात मरिटेनर, मॅच फी तसेच विजयाबद्दल मिळत असलेला बोनस एक वर्ष मिळणार नाही. याच महिन्यापासून ही कपात लागू केली जाणार आहे, असे मंडळाने सांगितले आहे.

करोनाचा धोका इंग्लंडमध्ये कमी झाल्यानंतर तेथे वेस्ट इंडिज, पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध मालिका खेळल्या गेल्या. मात्र, मंडळाला खूप मोठा तोटा झालेला आहे. त्यामुळे मंडळाने कपातीचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.