करोनाच्या टेस्टसाठीची शुल्काची मर्यादा हटवली

नवी दिल्ली- करोना विषाणूचा संसर्ग झाल्याची खात्री करण्यासाठी केल्या जाणाऱ्या “रिअल लाईफ-पॉलिमरेस चेन रिऍक्‍शन'(आरटी-पीसीआर) या वैद्यकीय चाचणीसाठी लागू असलेली 4,500 रुपयांच्या शुल्काची मर्यादा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात “आयसीएमआर’ने हटवली आहे.

“आयसीएमआर’चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून याबाबतची माहिती दिली आहे. भारतीय बनावटीच्या तपासणी किटसच्या वापरामुळे कोविड निदान करणे आता व्हायला लागले आहे. यामुळे तपासणीच्या बदललेल्या साहित्याच्या किंमती लक्षात घेता 17 मार्च रोजी जाहीर केलेली 4,500 रुपये शुल्काची मर्यादा आता मागे घेतली जात आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

मार्चमध्ये ज्याप्रमाणे “आरटी-पीसीआर’ टेस्टसाठी देशभरात कोणतेही आधार शुल्क उपलब्ध नसल्याने राज्य सरकारांनी आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रशासनाने खासगी प्रयोगशाळांबरोबर मिळून सामंजस्याने या टेस्टसाठीचे शुल्क निश्‍चित करावे, असेही “आयसीएमआर’ने आपल्या पत्रात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.