मुंबई – बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझा ( Remo DSouza ) याला आज हृदयविकाराचा झटका ( heart attack ) आला आहे. यानंतर त्याला तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत.
रेमोच्या हृदयात काही ब्लॉकेज होते. डॉक्टरांनी अँजिओग्राफी केली असून तो सध्या आयसीयूमध्ये आहे. त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. पुढील 24 तास खूप महत्त्वाचे आहेत, अशी माहिती रेमोची पत्नी लिझेल डिसूझाने दिली.
दरम्यान, प्रसिद्ध गाण्यांच्या कोरिओग्राफीशिवाय रेमोने “एबीसीडी’, “एबीसीडी 2′ आणि “स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. “डान्स इंडिया डान्स’, “डान्स प्लस’ आणि “झलक दिखला जा’ यासारख्या रिऍलिटी शोमध्ये त्यानं परीक्षक म्हणून भूमिका पार पाडली होती.