- आठ रुग्णांचा मृत्यू
- 292 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज नवीन 162 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 8 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरामध्ये 94088 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 160 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. आज दिवसभरात 8 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 5 तर शहराबाहेरील 3 जणांचा मृत्यू झाला. शहरातील किवळे, चिखली, नेहरुनगर, चिंचवड येथील 5 जणांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील येरवडा, सिंहगड रोड व रावडीवाडी येथील तिघांचा मृत्यू झाला. आजपर्यंत 2409 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1716 व शहराबाहेरील 696 रुग्णांचा समावेश आहे.
आज दिवसभरात 292 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 90765 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2733 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 851 रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 803 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 804 इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयात करोनाने ज्येष्ठाचा मृत्यू
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (दि. 11) करोनाने 65 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला. रुग्णालयात 6 करोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली.
इनामगाव (ता. शिरूर) येथील ज्येष्ठाचा करोनाने मृत्यू झाला आहे. पिंपळे निलख, निरा (ता. पुरंदर), देगाव (ता. भोर), औंध, बिबवेवाडी, सदाशिव पेठ येथील रहिवासी करोनाबाधित आढळले आहेत. 4 महिला आणि 2 पुरुष रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. रुग्णालयात सध्या 31 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पिंपरी-चिंचवड : 1 आणि पुणे ग्रामीण – 4 अशा 5 करोना संशयित रुग्णांना आज उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.