तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – पारंपरिक वेशभूषा, पालखी सोहळा, शोभायात्रा, संतांच्या वेशभूषा परिधान करून सहभागी झालेली लहान मुले आणि ढोल – ताशांच्या गजरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्तव विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण आठवडाभर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन झाले.
या वेळी अनिल फाकटकर ,सचिन टकले, नितीन फाकटकर यांनी मार्गदर्शन केले. मिरवणुकीत चौका चौकात फटाक्यांची अतिशबाजी, कुमार क्षितिज गावडे यांचा लाठीकाठीचा मर्दानी खेळ, आळंदी येथील शिंदे महाराजांची वारकऱयांची दिंडी, श्रीमंत सत्यशीलराजे दाभाडे यांचा सहभाग होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय खोल्लम, भूषण खोल्लम, शुभम फाकटकर, स्वप्निल घबाडे, नितीन खोल्लम, संजय टकले, राजेश घोडेकर, गणेश बेल्हेकर, नंदकुमार बेल्हेकर, नंदकिशोर खोल्लम, जयश्री कुलकर्णी, मीनल फाकटकर, उषा खोल्लम, भास्कर निघोजकर आदीचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल बेल्हेकर यांनी केले. कविता खोल्लम यांनी आभार मानले.