चिंबळी, (वार्ताहर) – निघोजे (बालिंगेवस्ती)ता खेड) येथील वनराज गणेश मदिरांच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी (दि. 21) विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
गणराज गणेश मदिरांच्या 10व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश मदिरांला भव्य विधुत रोषणाई करून मंडप उभारण्यात आला असुन बुधवार दि 21 सकाळी मंदिरात पहाटे 5 ते 7 भैरवनाथ भजनी मंडळाच्या वतिने अभिषेक व काकड आरती सकाळी 8 ते 1 होम हवन व सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 ते 4 भैरवनाथ भजनी मंडळाचा संगीत भजनाचा कार्यक्रम सायंकाळी 4 ते 6 हरिपाठ व महाप्रसाद तसेच होणार असुन सायंकाळी 8 ते 10 समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन, रात्री 10 ते 12 संगीत भजनाचा हरिजागर होणार आहे.
या कार्यक्रमाचा परिसतील सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन निघोजे (बालिंगेवस्ती) सर्व ग्रामस्थांच्या वतिने करण्यात आले आहे