शिरूर : शिरूर तालुक्यातील शिरूर शहरात गुजरमळा 1 तर शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे 1 महिला असे तालुक्यात दोन जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
तर बाफना मळा एका 52 वर्षे शिक्षकाचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. येथील त्यामुळे आजचा दिवस केवळ कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्ण निघाल्याने शिरूर तालुक्याला मोठा दिलासा देणारा ठरला आहे.
शिरूर शहरातील गुजर मळा येथील खेड येथे ते आरोग्य खात्यात कामाला असणाऱ्या 45 वर्ष पुरुषाला कोरोना ची लागण झाली आहे. तर शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील 39 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. तर बाफना मळा येथील काही दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 5२ वर्षीय शिक्षकाची कोरोना बरोबर महिनाभर सुरू असलेली लढाई संपली असून यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
शिरूर शहरातून 18 जणांचे तर शिरूर तालुक्यातून 4 जणांचे असे एकूण 22 जणांचे कोरोना तपासणीकरिता नमुने पाठवण्यात आले असल्याची माहिती ती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तुषार पाटील यांनी दिली आहे.