नवी दिल्ली – मागील दोन वर्षांपासून करोना संसर्गाने संपूर्ण जगाला त्रस्त करून सोडलं. मात्र तब्बल एक वर्षानंतर संशोधकांना करोना संसर्गावर प्रतिबंधक लस तयार करण्यात यश आले. त्यानंतर जगभरात लसीकरणही झालं. मात्र अजुनही अनेकजण लस घेण्यास टाळाटाळ करतात. अशाच एका तरुणींने लस घेण्यास नकार दिला होता. मात्र त्याची त्या तरुणीला मोठी किंमत मोजावी लागली आहे.
आपण तरुण आहोत. आपल्याला लस घेण्याची गरज नाही, असं त्या तरुणीने म्हटलं होतं. मात्र या तरुणीला आपल्या २२ व्या वाढदिवसाच्या दोनच दिवसांनी करोनाची लागण झाली. या तरुणीला सुरुवातीला घरीच क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मात्र श्वास घेण्यास त्रात होत असल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दरम्यान रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही दिवसांतच ती तरुणी कोमात गेली. पाच दिवस कोमात राहिल्यानंतर शुद्धीवर आल्यावर तरुणीला स्वत:ची अवस्था पाहून धक्का बसला. तिच्या डोक्यावरचे सर्व केस या दरम्यान गळाले होते. फिओन बार्नेट असे त्या तरुणीचे नाव असून ती मार्केटिंगची विद्यार्थीनी आहे.
फिओन हिने लस घेण्यास टाळाटाळ केली होती. तसेच आपण तरुण आहोत, आपल्याला लस घेण्याची गरज नाही, अस तिचं म्हणणं होतं. आता फिओन पूर्वपदावर येत आहे. तरी अजुनही तिची अवस्था बिकट आहे. मात्र लस न घेण्याची पश्चाताप तिला होणार हे नक्की.