मुंबई – पार्टी हा विषय बॉलिवूड वाल्यांसाठी सर्वात आवडीचा विषय आहे. म्हणूनच नवीन वर्षाच्या तयारीसाठी अनेक बॉलिवूड स्टार सज्ज झाले आहेत. काहींनी आपल्या घरी पार्टीचे नियोजन केले आहे तर काही व्हेकेशनवर गेले आहेत. अभिनेत्री सारा अली खान देखील सध्या युरोपमध्ये आपल्या सुट्ट्या घालवत आहे. साराचा युरोपमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
सारा सध्या लंडनमध्ये आहे यावेळी तिच्यासोबत तिची आई देखील आहे. लंडनमध्ये मजामस्ती करतानाचे व्हिडीओ आणि फोटोज सारा सध्या आपल्या सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. यातील तिचा एक व्हिडीओ चाहत्यांना भलताच आवडला आहे. या व्हिडिओमध्ये ती स्विमिंग पुलमधून बाहेर येताना दिसत आहे. स्लो मोशनमध्ये काढलेला हा व्हिडीओ आणि साराचा त्यातील बोल्ड अवतार चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
View this post on Instagram
साराचा या हॉट लूकवर चाहते फिदा झाले आहेत. आता काय पाण्यात आग लावणार का ? अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर दुसर्याने साराला ऍडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. साराचा हा बोल्ड लूकवाला फोटो सोशल मीडियावर अनेकांनी शेअर देखील केला आहे.