पुणे- दिवसभरात 333 नव्या बाधितांची नोंद झाली असून, सक्रीय बाधितांची संख्याही वाढली आहे. सध्या 3,007 सक्रीय बाधित आहेत.
बाधितांची संख्या दररोज तीनशेपेक्षा जास्त वाढत आहे. त्यामुळे सध्या चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातून सक्रीय बाधितांची संख्याही वाढली आहे. या बाधितांमधील 224 व्यक्तींची प्रकृती गंभीर असून, 372 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. 187 जणांना गेल्या 24 तासांत डिस्चार्ज मिळाला आहे.
आजपर्यंत 4,85,35 बाधित सापडले असून, त्यातील 4,73,313 जण बरे झाले आहेत. मात्र आजपर्यंत 8 हजार 715 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गेल्या 24 तासांतील 6 मृत्यूंचा समावेश आहे. याशिवाय आणखी चार जणांचा मृत्यू झाला असून, ते पुण्याबाहेरील आहेत. दिवसभरात 7 हजार 791 संशयितांची स्वॅब टेस्ट झाली आहे.