माद्रीद – ला लीगा फुटबॉल स्पर्धेत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करताना रेयाल माद्रिदने विजेतेपदाला गवसणी घातली. स्पॅनिश फुटबॉल स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघ मानल्या जात असलेल्या रेयालने एस्पान्योलला 4-0 असे पराभूत केले.
या विजयासह त्यांनी या स्पर्धेचे विक्रमी 35 वे विजेतेपद साकार केले. एस्पान्योलविरुद्ध मिळवलेल्या विजयामुळे रेयालने चार सामने बाकी असतानाचला लिगा स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या सेव्हियावर 17 गुणांची आघाडी मिळवली आहे.
एस्पान्योलविरुद्धच्या सामन्यात रेयालकडून रॉड्रिगोने (33 आणि 43 वे मिनिट) दोन, तर मार्को असेन्सिओ (55 वे मि.) आणि स्ट्रायकर करीम बेन्झेमा (81 वे मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.