शारजा – रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा आज कोलकाता नाईट रायडर्सशी सामना होत आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळुरू संघासमोर कोलकाताचे आव्हान राहणार आहे. सामन्यास भारतीय प्रमाण वेळेनुसार सांयकाळी 7.30 वाजता सुरूवात होणार आहे.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा रॉयल चॅलेंजर बेंगळुरूच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार विराट कोहली याने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
#RCB wins the toss and they will bat first against #KKR in Match 28 of #Dream11IPL.#RCBvKKR pic.twitter.com/MKARrLBUxM
— IndianPremierLeague (@IPL) October 12, 2020
दरम्यान, स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघाचे 6 सामने झाले आहेत. दोन्ही संघानी 6 पैकी 4 सामन्यात विजय मिळविला आहे तर दोन सामन्यात पराभव दोन्ही संघाचा पराभव झाला आहे. गुणतालिकेत दोन्ही संघाचे 8 गुण असून रनरेटनुसार कोलकाता तिसऱ्या तर बेंगळुरू चौथ्या स्थानावर आहे.