प्योंगयांग – उत्तर कोरियाचा तानाशाह किम जोंग उन यांनी कोरोना महामारी दरम्यान देशाची योग्य प्रकारे काळजी न घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सत्ताधारी पक्षाच्या 75 व्या स्थापना दिवस सोहळ्याप्रसंगी भाषण करताना किम जोंग उन यांनी भाऊक होऊन अश्रू ढाळले.
किम जोंग उन म्हणाले की, लोकांनी माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवला. पण
मला वाटते की, लोकांच्या विश्वासालायक मी काम करू शकलो नाही. त्यामुळे
मी माफी मागतो.
देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी ही किम इल-सुंग आणि किम जोंग-इल यांसारख्या महान काॅम्रेडच्या वारसाशी जोडलेली होती. मात्र, प्रयत्न आणि प्रमाणिकपणाच्या अभावामुळे मी लोकांचे दु:ख दूर करू शकलो नाही. ही जबाबदारी वडिलांनी आणि आजोबांनी खूप चांगल्या प्रकारे पार पाडली होती. असे किम जोंग उन म्हणाले.