दहिवडी, (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सातारा (पूर्व) जिल्हाध्यक्षपदी मलवडी, ता. माण येथील रवींद्र कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप, उपाध्यक्ष संतोष नानवटे, सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे व पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास देसाई यांनी कदम यांना नियुक्तीचे पत्र दिले.
मराठा समाजाच्या उन्नतीसाठी, संघटनेच्या चौकटीत कार्यरत राहण्याची आणि संघटनेची मजबूत बांधणी करण्याची ग्वाही रवींद्र कदम यांनी दिली. या निवडीबद्दल कदम यांचे गणेश काटकर, आप्पा देशमुख, शंकर इंगळे, राजू मुळीक, सोहम शिर्के, बालाजी जगदाळे, प्रसाद माने, सचिन माने, सागर कट्टे, अजय मगर, उमेश मगर, बाळराज जगदाळे यांनी अभिनंदन केले.