Ravindra Jadeja Father Interview – रवींद्र जडेजा हा भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू सध्या चर्चेत आहे. रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्ध जडेजा यांनी आपला मुलगा व सुनेवर गंभीर आरोप लगावले आहेत. मुलगा व सून भेटायला येत नाहीत, साधा फोनही करत नाहीत अशी कैफियत त्यांनी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडली आहे.
रवींद्र जडेजाच्या वडिलांची मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. ‘सर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रवींद्र जडेजाची नेटकऱ्यांनी शाळा घेतली आहे. । Ravindra Jadeja Father Interview
ट्विटरवर असीम फारुकी या युजरने रवींद्र जडेजाला सुनावले आहे. ‘आई वडिलांचे हृदय दुखावून आजपर्यंत कोणीही सुखी राहू शकलं नाही’ असा मोलाचा सल्ला जडेजाला दिला आहे.
Sad to hear from your father but #RavindraJadeja you should know about this atleast 👇 pic.twitter.com/1NfZ5D3hZA
— Aasim Farooqui (@AsmFar07) February 9, 2024
राजू नावाच्या व्यक्तीने वडिलांच्या आरोपानंतर IPL २०२३ फायनलची आठवण करून दिली आहे. हा सामना जिंकल्यानंतर रिवाबाने जडेजाचे पाय धरले होते. त्यावेळी याची बरीच चर्चाही झाली होती. यावरूनच चिमटा काढत, कॅमेऱ्यासमोर व खऱ्या आयुष्यात अशी तुलना राजू या युजरने केली आहे.
1. in real life 🤡🤡
2. in front of camera🫵#RavindraJadeja pic.twitter.com/rmv75xwxBh— Rajuuu🥀💓🌸 (@raju01644) February 9, 2024
नवीन कुमावत या एक्स युजरने यावर नाराजी व्यक्त केली आहे. जडेजा तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असं लिहीत तुटलेल्या हृदयाचे इमोजी त्यांनी पोस्ट केले आहे. | Ravindra Jadeja Father Interview
Jadeja, this was not expected from you 💔#RavindraJadeja pic.twitter.com/aU33qgPVKG
— Naveen Kumawat (@naveen_4X) February 9, 2024
रवींद्र जडेजा यांच्या वडिलांनी केलेल्या आरोपांवरून सोशल मीडियावर मोठं वादळ आलं आहे. अनेकांनी जडेजाला त्याच्या कृतीबद्दल झापलं असून त्याची पत्नी रिवाबा हिला देखील खडे बोल सुनावले आहेत. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? हे कमेंट करून नक्की सांगा. । Ravindra Jadeja Father Interview