Telegram Update : तुम्हीही टेलिग्रामचे यूजर असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फायदेशीर ठरणार आहे. टेलिग्राममध्ये एकाच वेळी अनेक फीचर्स आले आहेत. नवीन अपडेटमधील सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे सेव्ह मेसेजेस 2.0. या फीचरच्या मदतीने, युजर्स मेसेज फिल्टर करू शकतील आणि मजकूर, मीडिया किंवा लिंक सेव्ह करू शकतील. याशिवाय टेलिग्राममध्ये अनेक अपडेटेड फीचर्स आले आहेत.
टेलीग्रामचे नवीन फीचर्स
टेलीग्राममध्ये आलेल्या नवीन वैशिष्ट्यांमध्ये वन टाइम व्हॉइस, व्हिडिओ मेसेज, पॉज आणि रिज्युम रेकॉर्डिंग, रीड टाइम इन प्राइवेट चॅट आणि नवीन डिझाइन यांचा समावेश आहे. नवीन अपडेट iOS आणि Android दोन्हीसाठी जारी करण्यात आली आहेत.
सेव्ड मेसेज 2.0
सेव्ह मेसेजेस 2.0 च्या मदतीने युजर्स मजकूर संदेश, मीडिया आणि लिंक्स इत्यादी फॉरवर्ड करू शकतील. या फीचरच्या मदतीने फॉरवर्ड केलेला कोणताही मेसेज वेगळ्या चॅट विंडोमध्ये पाहता येईल. या फीचर अंतर्गत कोणत्याही कॉन्टॅक्ट, ग्रुप किंवा चॅनलचे मेसेज सेव्ह करून ॲपच्या वर ठेवता येतात. सेव्ह केलेल्या मेसेजमध्ये टॅग देखील जोडले गेले आहेत. आता इमोजी टॅग आणि फिल्टरमध्ये देखील जोडले जाऊ शकतात.
वन टाइम व्हाईस आणि व्हिडीओ मेसेज
टेलिग्रामने व्हॉईस आणि व्हिडिओसाठी व्ह्यू वन्स फीचर सादर केले आहे. वन टाइम अंतर्गत पाठवलेले संदेश पुन्हा पाहिले जाऊ शकत नाहीत, कारण असे संदेश आपोआप हटवले जातात.
प्राइवेट चॅटमध्ये रीड टाइम
जेव्हा टेलीग्राममध्ये संदेशासह चेक मार्क दिसते, तेव्हा याचा अर्थ असा होतो की संदेश वितरित केला गेला आहे परंतु वाचला गेला नाही. दोन चेक मार्क म्हणजे संदेश वाचला गेला आहे पण डिलिव्हरी झाला आहे. आधी चेक मार्क फीचर खाजगी चॅटमध्ये काम करत नव्हते पण आता ते चालेल. आता रीड टाइम प्रायवेट चॅटमध्ये देखील वापरता येईल जे की 7 दिवसांसाठी असेल.
शेयर्ड कॉन्टेक्टसाठी नवीन डिझाइन
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, टेलिग्रामने प्रीमियम युजर्ससाठीसाठी कलर आणि त्याचे कॉम्बिनेशन इमोजी जारी केले होते जे संपर्कांसाठी होते. हे कस्टमाइजेशन नावासह दिसत होते, परंतु कॉन्टॅक्ट शेअर करताना असं दिसत नव्हते. आता नवीन अपडेटनंतर, जेव्हा तुम्ही एखादा कॉन्टॅक्ट शेअर कराल तेव्हा त्याच्यासोबत केलेले एडिटिंग दिसेल.