#CWC2019 : ‘तो’ संघाचा निर्णय – रवी शास्त्री

मुंबई – उपान्त्य सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात पहिले तीन गडी लवकर बाद होऊनही धोनीला सातव्या क्रमांकावर का खेळवले याचे उत्तर अखेर शास्त्री यांनी दिले असून धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय संपूर्ण संघाचाच होता, असे स्पष्टीकरण रवी शास्त्रींनी दिले आहे.

धोनीला सातव्या क्रमांकावर खेळायला पाठवण्याचा निर्णय संपूर्ण संघाचा होता. सर्व खेळाडूंचे त्यावर एकमत होते. विशेष म्हणजे हा काही मोठा निर्णय नव्हता. हा साधारण निर्णय होता. दुसरे असे की धोनी वरच्या क्रमांकावर खेळायला यावा आणि लवकर बाद व्हावा असे तुम्हाला वाटते का?, असा सवालही शास्त्रींनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.