मुंबई – प्रख्यात अभिनेत्री रवीना टंडनने 1991 साली चित्रपट ‘पत्थर के फूल’ मधून पदार्पण केले तिने अलीकडेच आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या संघर्षाबाबत अनेक खुलासे केले आहे. आपल्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली ? अन् ती हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी कलाकारांपैकी एक कशी बनली याबद्दल अलीकडेच खुलासा केला.
यातच एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने तिच्या चित्रपटसृष्टीतील संघर्षाबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली,’ मी सुरुवातीला एका स्टुडिओमध्ये काम करत होते. यावेळी तिथे काम करतांना स्टुडिओचे मजले साफ करत असे. तिथे मी फरशी आणि उलटी साफ करण्याचंही काम केलंय. मी दहावीपासून प्रल्हाद कक्कर यांना असिस्ट करायला सुरुवात केली. त्यावेळी तेथे येणारे लोक म्हणायचे तू पडद्यामागे काय करत आहेस? तू तर पडद्यावर दिसली पाहिजेस आणि मी म्हणायचे ‘नाही नाही, मी, अभिनेत्री? कधीही नाही.’
मात्र जेव्हा पण प्रल्हाद यांच्या सेटवर मॉडेल नसायच्या तेव्हा ते म्हणायचे रवीनाला बोलवा. ते मला माझा मेकअप करायला सांगायचे आणि मग मी फोटोसाठी पोज द्यायची.’ अशा प्रकारे मी मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यानंतर मला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. मी कधीही अभिनय, डान्स किंवा डायलॉग कसे बोलण्याचे याचे प्रशिक्षण घेतलेले नाही. मला वाटते की मी हळूहळू हे सर्व शिकले.” असे तिने सांगितले.
दरम्यान बरीच काळानंतर रवीना ‘KGF: Chapter 2’ या चित्रपटात दिसली आहे. तिच्या वर्क फ्रंट बाबत सांगायचं झाल्यास अभिनेता संजय दत्तीनसोबत त्यांच्या आगामी ‘घुडछडी’ या चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहे.