Jyotipriya Mallick Arrested: पश्चिम बंगालमधील कोट्यवधी रुपयांच्या रेशन वितरण प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मंत्री ज्योतिप्रिया मल्लिक यांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (27 ऑक्टोबर) मंत्री मल्लिक यांना न्यायालयात हजर केले असता सुनावणीदरम्यान ते बेशुद्ध पडले. कोर्टात हजर केले असता ईडीने मलिक यांच्या कोठडीची मागणी केली.
अनेक तासांच्या चौकशीनंतर ईडीने ज्योतिप्रिया मलिक यांना अटक केली. तपास यंत्रणेने अटक केल्यानंतर टीएमसीचे नेते ज्योतिप्रिया मलिक म्हणाले की, मी एका मोठ्या कटाचा बळी आहे. हा कट भाजप आणि त्यांचे नेते सुभेंदू अधिकारी यांनी रचल्याचा आरोपही मलिक यांनी केला.
ममता बॅनर्जी यांनी दिला होता इशारा –
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच सांगितले होते की, मलिक आजारी आहेत, त्यांना काही झाले तर पोलिसात तक्रार दाखल केली जाईल. त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होत्या. या संपूर्ण प्रकरणाला त्यांनी भाजपचे घाणेरडे राजकारण म्हटले आहे.
Ration scam: Arrested Bengal minister Jyotipriya Mallick faints inside courtroom
— Press Trust of India (@PTI_News) October 27, 2023
प्रकरण काय आहे?
ईडीच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण प्रकरण कोविड लॉकडाऊन दरम्यान सार्वजनिक वितरण प्रणाली आणि अन्नधान्य वितरणातील कथित अनियमिततेशी संबंधित आहे. याबाबत मलिक यांची चौकशी करणे आवश्यक आहे.