World Cup 2023 Pakistan vs South Africa Match Live Updates : विश्वचषकाच्या 26व्या सामन्यात पाकिस्तानसमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ 46.4 षटकांत सर्वबाद 270 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 271 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
पाकिस्तान संघ पुन्हा एकदा पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेने त्यांना 46.4 षटकांत 270 धावांत गुंडाळले. पाकिस्तानकडून सौद शकीलने सर्वाधिक 52 आणि कर्णधार बाबर आझमने 50 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त शादाब खानने 43 आणि मोहम्मद रिझवानने 41 धावांचे योगदान दिले. तर मोहम्मद नवाजने 24, इफ्तिखार अहमदने 21 आणि इमाम उल हकने 12 धावा केल्या. अब्दुल्ला शफीक नऊ धावा करून, मोहम्मद वसीम ज्युनियर सात धावा करून आणि शाहीन आफ्रिदी दोन धावा करून बाद झाले. हरिस रौफ खाते न उघडता नाबाद राहिला.
Fluent half-centuries from @saudshak and @babarazam258 plus an important contribution from @76Shadabkhan sees Pakistan post 270 🏏#PAKvSA | #CWC23 | #DattKePakistani pic.twitter.com/9Zo3sgSC5C
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 27, 2023
चेन्नईच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून फिरकीपटू तबरेझ शम्सीने सर्वाधिक 4 बळी घेतले. यादरम्यान त्याने 10 षटकात 6 च्या इकॉनॉमीसह 60 धावा खर्च केल्या. याशिवाय मार्को यानसेनने 3 पाकिस्तानी फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कोएत्झीला 2 आणि लुंगी अँडिगीला 1 यश मिळाले.
टाॅस आणि playing 11..
तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बाबरने संघात दोन बदल केले तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने तीन बदल केले आहेत.
PAK vs SA : दोन्ही संघांचे Playing11 :-
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एनगिडी.
पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, शादाब खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ.
दरम्यान, या विश्वचषकात पाकिस्तान संघाने पाचपैकी दोन सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत पाक संघ सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका पाचपैकी चार सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे.