मुंबई – दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना केवळ दक्षिण भारतातच नाही तर देशभरात लोकप्रिय आहे. तिचा प्रत्येक चाहत्यांची मने जिंकतो. रश्मिका अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. आज अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती एका झकपक अवतारात दिसत आहे.
रश्मिकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती सोनेरी चमकदार लेहेंग्यात दिसत आहे. डीप नेक कट स्लीव्ह देशमुळे अभिनेत्रीने आपल्या लुकमध्ये बोल्डनेस वाढवला आहे. हीच तिची किलर स्टाईल सगळ्यांना भुरळ घालत आहे. यावेळी अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले,’मी आज गोल्डन गर्ल आहे… तुम्हाला हा कुल लूक मान्य आहे का?’. असा सवाल यावेळी अभिनेत्रीने विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. एका चाहत्याने लिहिले – तू आमच्यासाठी ३६५ दिवस गोल्डन गर्ल आहेस. तर दुसर्याने लिहिले. तर अनेकांनी हार्टचे इमोजी पोस्ट केले आहे.
View this post on Instagram
नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदान्ना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.अभिनेत्री मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुड बाय’ या तिच्या बॉलिवूड डेब्यू चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती बिग बींच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.