नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आधी निश्चित झाल्याप्रमाणे आज 27 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. ते प्रकरण त्या दिवशीच्या न्यायालयीन कामकाजाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. आता सगळ्यांचेच लक्ष त्या सुनावणीकडे लागले आहे.
अशातच शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल सध्या युक्तिवाद करत आहेत. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी असा सवाल सिब्बल यांनी मांडला कि,’ निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाचा मूळ पक्ष असल्याचा दावा, मात्र पक्षाचं सदस्यत्व आहे की, नाही ? तसेच व्हीप धुडकावणाऱ्यांवर राजकीय पक्षाला कारवाईचे अधिकार, ते संबंधित पक्षाचे असतात, अपक्ष नाही; असंही सिब्बल म्हणाले आहेत.
पहा संपूर्ण व्हिडिओ