साउथ सेंसेशन आणि नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना “मिशन मजनू’मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. काही दिवसांपासून रश्मिका आपल्या आपल्या आगामी प्रोजेक्ट्ससाठी मुंबईत सातत्याने येत होती. तसेच आपल्या बॉलीवूडमधील पहिल्या चित्रपटासाठीही तिला अनेक वेळा मुंबईला यावे लागले होतो. अशातच तिने आता मुंबईत स्वतःसाठी एक घर खरेदी केले आहे.
View this post on Instagram
रश्मिकाला “मिशन मजनू’ आणि बॉलीवूडमधील अन्य प्रोजेक्टच्या तयारीसाठी मुंबई-हैदराबाद अशी धावपळ करावी लागली होती. यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला होता. यामुळे मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावे यासाठी तिने एक बंगला खरेदी केला आहे.
View this post on Instagram
मुंबईतील बंगल्याला होमली फीलिंग येण्यासाठी रश्मिकाने हैदराबादवरून अनेक वस्तूही आणल्या आहेत. यापूर्वी ती मुंबईत हॉटेलमध्येच वास्तव्य करत होती. परंतु आता तिने स्वतःचे घर खरेदी केल्याने मुंबईवर असलेले तिचे प्रेमही दिसून येत आहे.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास रश्मिका “मिशन मजनू’मधून चाहत्यांच्या भेटीस येत आहे. याशिवाय तिच्याकडे बॉलीवूडमधील आणखी एक प्रोजेक्ट आहे. परंतु त्याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेलना नाही. “सरीलेरू नीकेवरू’, “गीता गोविंदम’ आणि “प्रिय कॉमरेड’ अशी दक्षिणमध्ये हिट चित्रपट दिल्यानंतर रश्मिका आता बॉलीवूडमध्ये नशिब आजमावित आहे.