पुणे – लॉकडाऊन जाहीर होताच शहरातील स्वॅब तपासणीबरोबरच रॅपिड ऍन्टिजेन्स टेस्टच्या संख्येत वाढ झाल्यामुळे बाधित संख्येने गुरुवारी 1,812 रुग्णांचा उच्च्चांक नोंदविला. दिवसेंदिवस वाढणारी बाधित संख्या प्रशासनाची चिंता वाढवत आहे.
6,582 जणांच्या तपासणीतून ही संख्या समोर आली. त्यामध्ये दिवसभरात 2,969 रॅपिड ऍन्टिजेन्स तपासणी केली असून, 485 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अन्य बाधितसंख्या ही मागील दोन दिवसांतील स्वॅब तपासणी अहवालातील आहे. शहरातील विविध रुग्णालयांत सध्या 10 हजार 644 बाधितांवर उपचार सुरू आहेत.