बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली या जोडीने सोशल मीडियावर गुड न्यूज शेअर केल्यापासून त्यांचे चाहते, क्रिकेटपटू आणि बॉलीवूडमधील सेलिब्रिटीज यांनी शुभेच्छांच्या वर्षाव सुरू केला आहे.
या शुभेच्छांमध्ये अभिनेता रणवीर सिंह याने दिलेला एक मॅसेज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रणवीरने आपल्या स्टाइलमध्ये विरुष्काला शुभेच्छा दिल्या आहे. रणवीरने दोघांनाही वेगवेगळया शुभेच्छा दिल्या आहेत.
रणवीरने विराटच्या इंस्टाग्रामवर कमेंट्स करत 3 हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत. तर दुसरीकडे अनुष्काच्या इंस्टाग्रामवर हार्ट आय इमोजी, इवल आय इमोजी, प्रेयर हॅंड्स आणि हार्ट इमोजीसह शुभेच्छा दिल्या आहेत. या कमेंट्सवरून स्पष्ट होते की, रणवीर आणि अनुष्का यांच्यातील मैत्री आजही कायम आहे. हे दोघेजण कधी काळी रिलेशनशिपमध्ये राहिलेले आहेत.
परंतु ब्रेकअपनंतरही दोघांमधील संबंध हे खूपच फ्रेंडली असल्याचे अनेकवेळा दिसून आलेले आहे. ब्रेकअपनंतर या दोघांनी “दिल धडकने दो’ या चित्रपटात एकत्रित काम केले होते.
दरम्यान, रणवीरने या दोघांना दिलेल्या शुभेच्छा सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. यावर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत असून रणवीर आणि अनुष्का यांच्यातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे.