बॉलिवुडमधी आघाडीचा अभिनेता रणवीर सिंहने आपल्या दमदार अभिनायाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले असून बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटांशिवाय रणवीर सिंह सोशल मीडियावरही सतत ऍक्टिव असतो. तो चाहत्यांसोबत आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. तसेच चॅट सेशनमध्ये चाहत्यांशी थेट संवादही साधत असतो.
दरम्यान, इंस्टाग्राम लाईव्हवर रणवीरने हेटर्सला आपल्या अंदाजात सडेतोड उत्तर दिले आहे. या सेशनवेळी “ऐ म्यूझिक बंद कर, ऐ तुला हिंदी येत नाही का?, हा जोकर वाटतो’ अशा कॉमेंट्स आल्या. यावर प्रत्युत्तर देताना रणवीर म्हणाला, तुम्हा लोकांना काही कामधंदा नाही का? तुम्ही अन्य ठिकाणी वेळ घालवा. माझ्या आयुष्यात कशाला आला, असा शब्दात सुनाविले.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास रणवीर आणि दीपिका हे पती-पत्नी आगामी “83′ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करत आहे. हा चित्रपट 1983च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर आधारित असून पुढील वर्षी एप्रिलमध्ये तो चित्रपटगृहात झळकणार आहे.