बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग हा टॉप अभिनेत्यांपैक एक अभिनेता म्हणून ओळखला जातो. सध्या तो एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याला नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचा ब्रॅंड ऍम्बेसिडर बनवण्यात आले आहे.
त्यामुळे रणवीरच्या मेहनतीला आणखी एक सुपरहिट हिरोची पावती मिळाली आहे. रणवीर सिंगने ही आनंदाची बातमी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. रणवीरने एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, आपण पण आता नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनसोबत जोडला गेलो.
रणवीर सिंग एनबीए सोबत 2021-22च्या ऐतिहासिक 75व्या वर्षी बास्केटबॉल लीगचा विस्तार वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच रणवीर सिंगने म्हटले, मी एनबीए कुटुंबात सहभागी होण्यासाठी तसेच एनबीएचा ब्रॅंड ऍम्बेसिडर होण्यासाठी उत्सुक आहे.
बास्केटबॉल एक असा खेळ आहे जो माझा बालपणापासूनचा आवडता खेळ आहे. बास्केटबॉल या खेळाची आपल्या देशातील लोकांमध्ये आवड निर्माण करण्याची संधी मिळणे हे खूपच सन्मानकारक असल्याचे त्याने सांगितले.