Entertainment । विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील क्युट कपल्सपैकी एक आहे. जेव्हाही चाहते दोघांना एकत्र पाहतात तेव्हा ते खूश होतात. दोघे अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. विकीने 16 मे रोजी त्याचा 36 वा वाढदिवस साजरा केला. कतरिनाने पतीच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. कतरिनाने ही पोस्ट शेअर करून विकीवर खूप प्रेम व्यक्त केले. सोशलवर आता तिने शेअर केलेले फोटो व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री कतरिनाने विकी कौशलसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे. हे फोटो विकीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे आहे. फोटोंमध्ये विकीचे मिलियन डॉलर स्माईल दिसत आहे. त्याचा लुक सर्वांचे लक्ष वेधून घेणारा आहे.कतरिनाने विकीचे अनेक फोटो शेअर केले आहे. त्यातील एकामध्ये तो चहा पिताना दिसत आहे, तर दुसऱ्यामध्ये त्याच्यासमोर केक ठेवला आहे आणि तो हसत आहे. फोटो शेअर करताना कतरिनाने हार्ट इमोजी आणि केक इमोजी पोस्ट केले. या फोटोंवर चाहते खूप कमेंट करत आहेत. कॅटच्या पोस्टवर कमेंट करून चाहते विकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचे डिसेंबर २०२१ मध्ये लग्न झाले होते. कतरिना-विकीचे लग्न राजस्थानमध्ये झाले होते.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विकी लवकरच बॅड न्यूजमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी, एमी विर्क, फातिमा सना शेख आणि नेहा धुपिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय विकी छावामध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील त्याचा लूकही व्हायरल झाला आहे.