रणजितसिंह देशमुखांचे शिवसेनेतून निलंबन

सातारा : माण-खटाव मतदार संघात ‘आमचं ठरलंय’ टीममधील बिनीचे शिलेदार रणजितसिंह देशमुख यांची शिवसेनेतून निलंबन करण्यात आले आहे.

या मतदारसंघात ‘आमचं ठरलंय टीमच्या वतीने प्रभाकर देशमुख अपक्ष निवडणूक लढवत आहेत. या टीममध्ये सहभागी होऊन पक्षविरोधी काम करत असल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले होते. पाठोपाठ शिवसेनेने रणजितसिंह देशमुख यांचेही निलंबन करण्यात आले आहे.

शिवसेना-भाजपमधून माण-खटावमधील बड्या नेत्यांचे निलंबन झाल्याने त्यांची यापुढची वाटचाल कशी राहणार, ते पुढे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.