न्यायमूर्ती बोबडे होणार पुढील सरन्यायधीश, रंजन गोगोईंनी केली शिफारस

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पत्र लिहून आपले उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांचे नाव सुचवले आहे. सेवाज्येष्ठतेनुसार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बोबडे हे गोगोई यांच्यानंतरचे वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत.

दरम्यान, सरन्यायाधीश सेवानिवृत्तीआधी पुढील सरन्यायाधीशाचे नाव सुचवतात, अशी परंपरा आतापर्यंत राहिली आहे. त्यानुसार, बोबडे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. सरन्यायाधीश गोगोई १७ नोव्हेंबर २०१९ ला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी बोबडे यांचे नाव सुचवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.