बेंगळुरु – सुवेद पारकरचे द्विशतक तर सर्फराज खानचे दीडशतक यांच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात आपला पहिला डाव 8 बाद 647 धावांवर घोषित केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा उत्तराखंडने आपल्या पहिल्या डावात 2 बाद 39 धावा केल्या आहेत.
मुंबईने सोमवारच्या 3 बीाद 304 धावांवरून पुढे डाव सुरु केल्यावर पारकर व सर्फराजने उत्तराखंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. सर्फराजने आपले शतक पूर्ण केले तर दुसरीकडे पारकरने आपले पदार्पणातील द्विशतक साकार केले. या जोडीने अडीचशे धावांची भागीदारी केली. पारकर 252 तर सर्फराज 153 धावा करुन बाद झाल्यावर शम्स मुलीणीनेही अर्धशतक फटकावताना संघाला सहाशे धावांच्याही पुढे मजल मारुन दिली. उत्तराखंड आता 608 धावांनी पिछाडीवर आहे.
अन्य सामन्यांचे संक्षिप्त धावफलक :
बंगाल पहिला डाव – 178 षटकांत 5 बाद 577 धावा. (संदीपकुमार घरामी 186, अनुस्तुप मुजुमदार 117, अभिषेक पोरेल 68, मनोज तिवारी खेळत आहे 54) विरुद्ध झारखंड.
कर्नाटक पहिला डाव – 84 षटकांत सर्वबाद 253 धावा. (रवीकुमार समर्थ 57, श्रेयस गोपाल नाबाद 56, सौरभ कुमार 4-67, शिवम मावी 3-40) विरुद्ध उत्तर प्रदेश पहिला डाव – 37.3 षटकांत सर्वबाद 155 धावा. (प्रियम गर्ग 39, रिंकू सिंग 33, रोनित मोरे 3-47). कर्नाटक दुसरा डाव – 34 षटकांत 8 बाद 100 धावा. (मयंक आग्रवाल 22, सौरभ कुमार 3-32).
पंजाब पहिला डाव – 71.3 षटकांत सर्वबाद 219 धावा. (अभिषेक शर्मा 47, अनमोलप्रीत सिंग 47, अनुभव आग्रवाल 3-40, पुनित दाते 3-48). मध्य प्रदेश पहिला डाव – 99 षटकांत 2 बाद 238 धावा. (हिमांशु मंत्री 89, शुभम शर्मा नाबाद 102, मयंक मार्कंडे 2-70).