Ranji Trophy 2023-24 ( MUM vs VID Final) Day 2 Stumps : रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ यांच्यात खेळला जात आहे. विजेतेपदाच्या लढतीत विदर्भाची अवस्था अत्यंत वाईट आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मुंबईने दुसऱ्या डावात दोन गडी गमावून 141 धावा केल्या होत्या. आता मुंबईची एकूण आघाडी 260 धावांची झाली आहे. खेळ थांबला तेव्हा, अजिंक्य रहाणे 58 आणि मुशीर खान 51 धावांवर ( Ajinkya Rahane & Musheer Khan ) नाबाद परतले.
That’s stumps on Day 2 of the #RanjiTrophy #Final 🙌
Unbeaten half-centuries from Captain Ajinkya Rahane & Musheer Khan guide Mumbai to 141/2 in the second innings 👌👌
They now lead by 260 runs.
Scorecard ▶️ https://t.co/L6A9dXXPa2#MUMvVID pic.twitter.com/UyOJ6oX4sS
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 11, 2024
सध्या सामन्यावर मुंबईची पकड घट्ट आहे. रणजी करंडक स्पर्धेतील मुंबईची ही 48वी फायनल आहे. रहाणेच्या नेतृत्वाखाली संघ 42वे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करत आहे. विदर्भाने आतापर्यंत केवळ दोनदाच रणजी करंडक जिंकला आहे.
विजेतेपदाच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर मुंबईला पहिल्या डावात केवळ 224 धावा करता आल्या. मात्र, एकवेळ अवघ्या 111 धावांत संघाने 6 विकेट गमावल्या होत्या, मात्र शार्दुल ठाकूरने 75 धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.
त्यानंतर मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी कहर केला आणि संपूर्ण विदर्भाचा संघ अवघ्या 105 धावांत गुंडाळला. गोलंदाजीत मुंबईकडून शम्स मुलाणी, तनुष कोटियन आणि धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
पहिल्या डावात 119 धावांची आघाडी मिळविल्यानंतर दुसऱ्या डावात मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर पृथ्वी शॉ 11 आणि भूपेन लालवानी 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. या सामन्यात विदर्भ पुनरागमन करेल असे वाटत होते, मात्र त्यानंतर मुशीर खान आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी 107 धावांची भागीदारी करत सामन्यात मुंबईची आघाडी भक्कम केली.
रहाणे 109 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 58 धावांवर खेळत आहे. युवा मुशीर खान 135 चेंडूंत तीन चौकारांसह 51 धावांवर खेळत आहे. एकीकडे, मुशीरचा भाऊ सर्फराज खान टीम इंडियासाठी तर दुसरीकडे मुशीर मुंबईसाठी सतत धावा करत आहे.