Randeep Hooda : अभिनेता रणदीप हुड्डाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच तो ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटात झळकणार आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाची नुकतीच रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. रणदीपने चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर रिलीज डेटची घोषणा केली आहे.
या व्हिडीओला रणदीपने कॅप्शन दिले, “भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन नायक,एक सेलिब्रेटेड होते आणि एक इतिहासातून पुसले गेले. शहीद दिनी इतिहास पुन्हा लिहिला जाईल. हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.” रणदीपने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये “गद्दार? आतंकवादी? हीरो?” असे लिहिले आहे. तर या व्हिडीओच्या शेवटी “मुझे गांधी से नहीं, अहिंसा से नफरत है।” हा डायलॉग म्हंटल्याचे देखील ऐकू येते.
View this post on Instagram
रणदीपनं ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटानं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, “अखंड भारत – स्वातंत्र्य वीर सावरकरांचे स्वप्न, भारताचे वास्तव -दूरदर्शी नेत्याला श्रद्धांजली, ज्याची कथा जिवंत गाडली गेली.” या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन रणदीपनं केलं आहे. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट 22 मार्च रोजी रिलीज होत आहे. रणदीप हुड्डा व्यतिरिक्त अंकिता लोखंडे आणि अमित सियाल ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
दरम्यान, अभिनेता रणदीप हुड्डाने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात लीन लैश्रामसोबत विवाह केला. त्यांच्या लग्नाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती. रणदीप हुड्डा यांनी 2021 साली लिनच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. त्यानंतर दोघे 2023मध्ये विवाह बंधनात अडकले. रणदीपची पत्नी लिन ही मणिपूरची रहिवासी आहे आणि ती व्यवसायाने भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे.