अभिनेता रणदीप हुड्डा आणि जय पटेलने करोनाविरूध्द लढण्यासाठी केली ‘इतक्या’ कोटीची मदत

नवी दिल्ली – नवी दिल्ली – देशासमोर उभ्या असलेल्या करोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत म्हणून उद्योजक, सिनेकलाकार, राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार पुढे सरसावले आहेत. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, वरूण धवन, सनी देओल यांनी करोनाशी लढा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता रणदीप हूड्डा आणि त्याचा काॅर्पोरेट सहकारी जय पटेल यांनी सुध्दा या लढ्यात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

रणवीर हूड्डा आणि जय पटेल यांनी पंतप्रधान मदतनिधीला १ कोटी रूपये मदत करण्यांच जाहीर केलं आहे. तसेच इतरानां मदत देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. रणदीपने म्हटले आहे की, देशातील डाॅक्टर, नर्स, पोलिस व इतर सरकारी कर्मचारी हे करोना व्हायरस विरूध्द न घाबरता २४ तास आपली सेवा देत आहेत. त्या देशाच्या हिरोंना मी सलाम करतो.

दरम्यान, याआधी अक्षय कुमार याने २५ कोटी रुपयांचा तर वरुण धवनने मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.