मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात तांडव केला आहे. त्यातच भारतातही कोरोना व्हायरसने आपले हातपाय चांगलेच पसरले आहेत. फोफावत जात आहेत. देशातील कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार गेला आहे. देशात एकूण 1029 कोरोनाग्रस्त आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण 186 कोरोना बाधित आहेत. करोनाचा वाढता संसर्ग पाहता देशात २१ दिवसांचे लॉकडाउन घोषीत केले.
Khud toh parliament mei baith ke phone pe porn dekhte hai, humko Ramayan dekhne ko keh rahe hai?
— Kavita (@Iamkavitak) March 28, 2020
दरम्यान, लॉकडाउन काळात अनेकांना घरात बसून काय करावे असा प्रश्न पडला होता.अशातच सोशल मीडियावर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ पुन्हा दाखवण्याची मागणी करण्यात आली. पण आता एका अभिनेत्रीने रामायण पुन्हा दाखवण्यावर वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे.
कविता कौशिकने ट्विट केले आहे की,‘तुम्ही संसदेत बसून मोबाइलवर पॉर्न पाहता आणि आम्हाला रामायण पाहण्यास सांगता’ असे कविताने ट्विट केले होते. या ट्विटनंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले. एका युजरने तिला तू मोबाइलवर काही पाहू शकतेस. रामायण तर टीव्हीवर दाखवले जात आहे असे म्हणत तिला चांगलेच सुनावले आहे.