मुंबई – बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफबद्दलही खूप चर्चेत असतो. अलीकडेच रणबीर – आलिया बॉलिवूड स्टार्स यश चोप्रांच्या घरी पामेला यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचला होता.
यावेळी व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, आलिया आत प्रवेश करण्यापूर्वी चोप्रा हवेलीच्या प्रवेशद्वारावर चप्पल काढताना दिसत आहे. रणबीर त्यांच्या मागे होता, त्याने आलियाची चप्पल उचलली आणि आत एका कोपऱ्यात ठेवली. अभिनेत्याचे हे कृत्य इंटरनेटवर मन जिंकत आहे आणि चाहते रणबीरचे कौतुक करत आहेत.
दरम्यान, या व्हिडिओवर एका चाहत्याने लिहिले, ‘ओ माई गॉड… त्याची शैली आवडली’ एका चाहत्याने लिहिले, ‘नवरा असावा तर असा, ज्या प्रकारे त्याने आलियाची चप्पल उचलली..!!’ तर एका चाहत्याने लिहिले की, ‘आरके नेहमीच आलियासाठी हे करतो.’
वर्क फ्रंटबाबत बोलायचं झाल्यास, रणबीर कपूरचे एक नाही तर अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्याचा आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टरही समोर आला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना देखील मुख्य भूमिकेत आहे.