Ranbir Kapoor – बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आलिया भट्टची केमेस्ट्री सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अशात नुकताच सोशल मीडियावर त्यांच्या रोमँटिक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, हा व्हिडिओ 69 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात आलिया आणि रणबीरच्या डान्स परफॉर्मन्स दरम्यानचा आहे.
69 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात आलिया आणि रणबीर दोघांनीही बाजी मारली. जिथे रणबीरला ‘ॲनिमल’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्याचबरोबर आलिया भट्टला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अशात या अवॉर्ड फंक्शनमध्ये पत्नीसोबत डान्स आणि किस करतानाचा रणबीरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
सोशलवर सर्वाधिक चर्चेत रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये ‘ॲनिमल’ चित्रपटातील ‘जमाल कुडू’ या हिट गाण्यावर हे जोडपे डान्स करताना दिसत आहे. आलिया देखील रणबीरच्या अशाच डान्स स्टेप्स फॉलो करताना दिसली. यानंतर निघताना रणबीरने आलियाच्या गालावर किस केले. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. यावर कमेंट करताना अनेक यूजर्स रणबीरला जंटलमन म्हणत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘रणबीर आणि आलिया खुलेपणाने आयुष्य जगतात. त्याची मुलगी खूप भाग्यवान आहे’ अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत.