मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाबाबत अनेक बातम्या सातत्याने येत आहेत. या दोघांच्या चाहत्यांनादेखील त्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे. रणबीर आणि आलिया हल्ली नेहमी एकत्र दिसतात. दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कधीही जाहीर वाच्यता केलेली नाही. परंतु त्या दोघांचं सतत एकत्र असणं, एकमेकांच्या घरी प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होणं, बाहेर फिरणं यावरुन ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत, अशा बातम्या नेहमी येत असतात.
View this post on Instagram
2020 च्या सुरुवातीला अशी बातमी समोर आली होती की दोघे यावर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत, मात्र तसं झालं नाही. असं असलं तरी वर्षाअखेरीस आलिया-रणबीरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता अशा चर्चा होत आहेत की, रणबीर-आलिया आज साखरपुडा करणार आहेत.
View this post on Instagram
नीतू कपूर यांच्याबरोबर आलिया-रणबीर देखील जयपूरला रवाना झाले आहेत. त्यानंतर नीतू कपूर यांनी देखील रणवीर-रणबीर बरोबरचा जयपूरमधील फोटो पोस्ट केला होता.
View this post on Instagram
दरम्यान, रणवीर आणि आलिया पहिल्यांदाच अयान मुखर्जी यांच्या ‘ब्रम्हास्र’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडीया हे कलाकार असणार आहेत. शूटींगदरम्यानचे अनेक फोटो या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत.