लाहोर – पाकिस्तानचे माजी कसोटीपटू व समालोचक रमीझ राजा पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होणार आहेत. एहसान मनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही राजा यांच्या नावाला पसंती दिली असल्याने त्यांची नियुक्ती आता केवळ औपचारिकता राहिली आहे.
रमीझ राजा आणि एहसान मनी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली होती त्यात राजा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांना माझ्या कल्पना आवडल्या. मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर पाकिस्तान क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करेन, असे राजा यांनी सांगितले आहे.