मुंबई- मराठी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून रसिकांच्या मनात घर करणारा अभिनेता ‘शंतनू मोघे’ आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. शंतनू मोघे आपल्या आगामी ‘श्री राम समर्थ’ चित्रपटात रामदास स्वामींच्या भूमीतेकत दिसणार आहे. या चित्रपटात राष्ट्रसंत रामदास स्वामी यांचा संपूर्ण जीवन प्रवास पहायला मिळणार आहे.
‘श्री राम समर्थ’ चित्रपट १ नोव्हेंबर २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा असून, हा चित्रपट विप्र एंटरटेनमेंटच्या अश्विनी माहेश्वरी आणि दिशादीपा फिल्म्सच्या दीपा सुरवसे यांची निर्मिती असणार आहे.