अमिताभ बच्चन आणि अजय देवगणच्या मुख्य भूमिका असलेल्या “मेडे’ या थ्रिलर ड्रामामध्ये रकुल प्रीत सिंह एका पायलटच्या रोलमध्ये दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील अजय देवगण करतो आहे. याच वर्षी डिसेंबरमध्ये हैदराबादेत सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. अजय देवगण बरोबर रकुल प्रीत सिंहचा हा दुसरा सिनेमा असणार आहे.
View this post on Instagram
यापूर्वी “दे दे प्यार दे’मध्येही रकुलने अजयबरोबर काम केले होते. अलीकडेच अमली पदार्थांच्या संदर्भात “एनसीबी’ने रकुलची चौकशी केली होती. तेंव्हापासून तिच्याभोवती संशयाचे वलय होते. माध्यमांमधून सतत होत असलेल्या शेरेबाजीला थांबवावे यासाठी तिने दिल्ली उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती.
View this post on Instagram
त्यानंतर सुट्टी एन्जॉय करायला रकुल मालदिवला निघून गेली होती. याच दरम्यान अजय देवगणबरोबरच्या “मेडे’साठी तिची निवड झाली. म्हणून ती अधिक खूष आहे. त्यातही अमिताभ बच्चन हे देखील या सिनेमात असल्यामुळे तिचा आनंद आनखीनच वाढला आहे. अजय देवगणने यापूर्वी स्वतःच्या “अजय देवगण फिल्म्स’च्या बॅनरखाली बोल बच्चन, सन ऑफ सरदार, सिंघम रिटर्न्स, तान्हाजी- द अनसंग वॉरिअर आणि छलांग सारख्या सिनेमांचीही निर्मिती केली आहे.
View this post on Instagram